ट्रेंड – घर साफ करायची वेळ झाली!

दिवाळी जवळ आली की, घराघरांमध्ये सफाईचा कार्यक्रम सुरू होतो. एव्हाना बऱ्याच लोकांची घरात साफसफाई झालेली असेल. घरातील महिला वर्ग जुनी भांडी, कपडे, कपाट स्वच्छ करतात. घरातील भंगार सामान काढण्याचा कार्यक्रम सुरू असतो. बरं, अशा सफाईच्या कामात आपल्यापैकी अनेकांना रस नसतो, पण काही जणांना आईच्या किंवा बायकोच्या आग्रहाखातर सफाईमध्ये हिरिरीने भाग घ्यावा लागतो. अशा सर्व मंडळींची व्यथा मांडणारे काही मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही खरंच हसू आवरणार नाही. उठा उठा दिवाळी आली, घर साफ करायची वेळ आली… असे मीम्स चांगलेच व्हायरल होत आहेत.