स्वागत दिवाळी अंकांचे – थिंक पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवन जगताना प्रत्येकालाच अनेकविध अडचणींचा सामना करावा लागत असतो. या अडचणींकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा असे सांगणारा ‘थिंक पॉझिटिव्ह’ हा दिवाळी अंक आहे. अंकाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या राग प्रेरक आणि संहारक या मुलाखतीने होते. समस्यांना सामोरे जाताना नेहमी आपली चिडचिड होत असते. कधी कधी तर भयंकर राग येतो. या रागाला कसे आवरायचे, एक प्रभावी अस्त्र् म्हणून रागाला कसे हाताळायचे, राग मेंदूत कुठे राहतो, रोजच्या भेटण्यातला राग, सुपरवुमनचा धुमसणारा राग यावर भाष्य करणारे मजेशीर लेखन अंकात वाचायला मिळतील. बरोबरच कलावंतांच्या नजरेतून राग, सिनेमातून व्यक्त होणारा राग, राग योग, त्याचे व्यवस्थापन, व्यसन, समाजमाध्यमातला राग, संतांच्या दृष्टिकोनातला राग, संतसाहित्यातून उलगडणारा राग, अनुराग, मुलांचा आत्मसन्मान अशा लेखातून रागाचे भावविश्व उलगडण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न या अंकातून झाला आहे. स्मिता जोशी, रेणू दांडेकर, राजीव तांबे, अमोल उदगीरकर अशी लेखकांची तगडी टीम अनुभवता येणार आहे.

संपादक ः प्रभाकर भोसले

मूल्य ः 200 रुपये.