डोपिंग चाचणीत पुरुष खेळाडू निघाला गरोदर! आणि मग…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

शीर्षक वाचून गोंधळात पडलात ना.. पुरुष आणि गरोदर.. कसं शक्य आहे? पण, एका खेळाडूच्या बाबतीत ते शक्य झालं आहे. पण, हे प्रकरण काय आहे, ते समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला आहे.

त्याचं झालं असं की, अमेरिकेचा बास्केटबॉलपटू डी.जे. कूपर याची डोपिंग चाचणी करण्यात आली. त्यासाठी त्याच्या लघवीचे नमूने तपासणीसाठी मागवण्यात आले. चाचणी झाली आणि त्या अहवाल चक्रावून टाकणारा होता. कारण, या चाचणी अहवालात कूपर गरोदर असल्याचं लिहिलं होतं. ही बातमी बाहेर आली आणि एकच गोंधळ माजला. कूपर कसा काय गरोदर असू शकतो, यावर गदारोळ सुरू झाला. मग, त्याने अखेर सत्य परिस्थिती सांगितली. जेव्हा लघवीचे नमुने मागवण्यात आले होते, तेव्हा कूपरने दोषी आढळू नये यासाठी स्वतःऐवजी आपल्या प्रेयसीच्या लघवीचे नमुने दिले.

त्याची प्रेयसी गरोदर होती. मात्र, याची कल्पना नसल्याने त्याने ते नमुने तपासणीसाठी दिले आणि तिथेच फसला. कूपर याच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली असून तो पुढील वर्षी म्हणजेच 2020मध्ये पुन्हा खेळायला सुरुवात करू शकतो.