शिवकुमार यांच्या जामिनाविरोधातील ईडीची याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्या जामिनाविरोधात दाखल केलेली ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात शिवकुमार यांना जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  शिवकुमार यांना मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने 3 सप्टेंबरला अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला नाही.

 त्यामुळे त्यांची रवानगी तिहारमध्ये करण्यात आली होती. मात्र, शिवकुमार यांच्याविरोधातील सर्व कागदपत्रे चौकशी करणाऱया ईडीकडे असल्यामुळे पुराव्यांशी छेडछाड करण्याच्या प्रश्न येत नाही म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.