ज्ञानेश्वरीतील शब्दांचा परिपूर्ण कोश, ‘कालनिर्णय’तर्फे 61 वर्षांनी पुर्नप्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्ञानेश्वरीतील शब्दांचा परिपूर्ण कोश ‘ज्ञानेश्वरीचे शब्द-भांडार’ या ग्रंथाची तिसरी आवृत्ती कालनिर्णयने नुकतीच प्रकाशित केली. रामचंद्र नारायण वेलिंगकर यांनी या ग्रंथ लिहिला आहे.

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी प्रसिद्ध होऊन सुमारे 730 वर्षे झाली आहे. ज्ञानेश्वरी जसजशी जुनी होत गेली, तसे त्यातील काही शब्द दुर्बेध होत गेले. त्यावेळी या ग्रंथाला शब्दकोश-परिभाषेची गरज भासू लागली. ही साहित्यिक गरज लक्षात घेऊनच रामचंद्र नारायण वेलिंगकर यांनी ‘ज्ञानेश्वरीचे शब्द-भांडार’ हा ग्रंथ 1959 साली लिहिला. हा ग्रंथ 37 वर्षांनंतर कालनिर्णयने पुनर्प्रकाशित केला होता. त्यानंतर आता 61 वर्षांनी तिसरी आवृत्ती पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे. हा नुसत्या शब्दार्थांचा कोश नाही. संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेची आणि अवलोकनाची झेप केवढी मोठी होती आणि त्याकाळी मराठी भाषा किती प्रौढावस्थेला जाऊन पोहोचली होती हे दाखवून देणारा कोश आहे.