रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी अजिबात खाऊ नका, वाचा

सध्या आपल्याला सर्वांमध्येच युरिक अ‍ॅसिडची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. युरिक अॅसिड वाढल्यामुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टींचे सेवन करतो. परंतु अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा गोष्टींचे सेवन करतो ज्यामुळे आपल्या शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते. तर जाणून घेऊया रात्री कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.

साध्या पाण्यात ‘या’ वस्तू घातल्यास, आरोग्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे! वाचा

युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी रात्री काय खाऊ नये?

आपला रात्रीचा आहार हा फार विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. रात्री जेवल्यानंतर आपण लगेच झोपतो त्यामुळे शरीराची फारशी हालचाल होत नाही. अशावेळी रात्रीच्या आहार घेताना चौकस राहायला हवे.

 

लाल मांसामध्ये भरपूर प्युरिन असते. अशा परिस्थितीत रात्री ते खाणे हानिकारक ठरू शकते. रात्री लाल मांस खाल्ल्यामुळे, पचन मंदावते. रात्री मांस खाल्ल्याने सांध्यामध्ये युरिक अॅसिड क्रिस्टल्स जमा होऊ शकतात. जर तुम्हाला युरिक अॅसिड नियंत्रित करायचे असेल तर चुकूनही रात्री मांस खाऊ नका.

बऱ्याच जणांना रात्री जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते. रात्री गोड पदार्थांचे सेवन करत असाल तर काळजी घ्या. यामुळे यूरिक अॅसिड वाढण्यास अधिक वाव मिळतो.

महिलांनो आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा

पालक ही एक हिरवी पालेभाजी आहे. ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. परंतु रात्री त्याचे सेवन टाळावे. कारण पालकमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, म्हणून रात्री ते खाल्ल्याने यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते.

मसूर हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. परंतु रात्री मसूर खाल्ल्याने यूरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. कारण मसूरमध्ये प्युरिनचे प्रमाण सर्वाधिक असते.