आम्हाला यापुढे ‘माय लॉर्ड’ म्हणू नका! राजस्थान हायकोर्टातील न्यायाधीशांचे आवाहन

36

सामना ऑनलाईन, जयपूर

राजस्थान उच्च न्यायालयात यापुढे  ‘माय लॉर्ड’,  ‘यू आर लॉर्डशिप’ हे शब्द ऐकायला मिळणार नाहीत. खुद्द न्यायाधीशांनीच या शब्दांचा वापर करण्याची गरज नाही असे मत नोंदवले आहे. आम्हाला ‘माय लॉर्ड’, ‘यू आर लॉर्डशिप’ म्हणू नका, असे आवाहन न्यायाधीशांनी वकील आणि पक्षकारांना केले.

राजस्थान उच्च न्यायालयाने यासंदर्भात सोमवारी नोटीस जारी केली. संविधानातील ‘समानता’ या मूल्याचा सन्मान करत न्यायाधीशांनी अशाप्रकारचे आवाहन केले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या पूर्ण कोर्ट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. देशातील सर्वच न्यायालयांत न्यायाधीशांना उद्देशून हे सन्मानजनक शब्द वापरले जातात. मात्र आता पहिल्यांदाच राजस्थान उच्च न्यायालयातून हे शब्द हटवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या