
सामना प्रतिनिधी । शेवगाव
समाजासाठी त्यागाची भूमिका जगत राहिल्यास व्यक्तीला सन्मान नक्की मिळतो. त्यातून आनंद हे परमात्म्याचे रूप आपल्याला दिसून येते असे गौरवोद्गार हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर यांनी प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या अभिष्टचिंतन व अध्यात्मिक सामाजिक कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले. अध्यक्षस्थानी शरद कुबेर (समर्थ योग देवता मंदिर धुळे) होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार मोनिकाताई राजळे, प.पू.दादाजी वैशंपायन, प्रमिला देवी वैशंपायन, अण्णासाहेब वैशंपायन, राजाभाऊ कोठारी, एस.व्ही.कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, शेवगाव नगरपालिकेचे प्रशासक अंबादास गरकळ, दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सत्कार मूर्ती मनोहर फडणीस (गजानन आशिष संपादक ठाणे), मंगेशी ताई मून, अतुल पवार(बार्शी), डॉ महेंद्र गौषाल (बीड) आदींची उपस्थिती होती.
ह. भ. प. दयानंद महाराज पुढे बोलताना म्हणाले समाजात जगत असताना दुःखी पीडितांचे मातृत्व घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. जीवनात आनंद हाच महत्त्वाचा आहे आनंद हाच परमात्मा चे पहिले रूप रूप पहिले रूप रूप आहे. आज समाजात परमार्थाचे नाटक करून समाजातील भोळ्याभाबड्या जनतेच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी काही मंडळी आहेत. मात्र ते अशा पद्धतीने स्वतःचीच फसवणूक करत आहेत, असे प्रतिपादन केले केले.































































