
कुरीयर कंपनीतून बोलतोय असे सांगत सायबर गुन्हेगारांनी डॉक्टर दांपत्यास दोन लाखांचा चुना लावला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टर दांपत्याने त्यांच्या आईवडिलांनी कुरीयरद्वारे खाद्यपदार्थ पाठविले होते. मात्र ते पार्सल न आल्याने डॉक्टरांनी गुगलवर जाऊन कुरियर कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पार्सल लवकर पाहिजे असल्यास दोन रुपये पाठवावे लागतील असे त्या भामटय़ाने सांगितले. त्यानुसार आरोपीने त्यांना टेक्ट मेसेज करून यूमनीपे डॉट को डॉट इन ही लिंक पाठविली. ती लिंक ओपन करून डॉक्टरांनी बँक खात्याची माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काढून घेण्यात आले.



























































