माऊली चॅरिटेबल ऍण्ड मेडिकल ट्रस्टची डॉक्टर दिंडी; आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी फिरता दवाखाना, मोफत औषधोपचार

आषाढी एकादशीनिमित्ताने असंख्य वारकरी संप्रदाय, भाविक पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला जात असतात. या सर्व प्रवासात ऊन, पाऊस, वा-यात दिवसात 25 ते 30 किलोमीटर प्रवास करत असतात. अशा वेळी त्यांना सर्व वैद्यकीय सेवा देण्यासाठी माऊली चॅरिटेबल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट यांच्यावतीने डॉक्टर दिंडी काढली जाणार आहे. ही दिंडी 19 जून ते 6 जुलैपर्यंत काढण्यात येणार असून दिंडीच्या माध्यमातून भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा, उपचार केले जाणार आहेत.

आपले घरदार, शेती सोडून भाविक देहू व आळंदी ते पंढरपूरच्या दिशेने शेकडो किलोमीटरचे अंतर अन्न व पाणी, ऊन, वारा आणि पाऊस यांचा विचार न पायी प्रवास करतात. अशा असंख्य वारकरी संप्रदाय यांच्या वैद्यकीय सेवेसाठी माऊली चॅरिटेबल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट यांच्यावतीने 300 पेक्षा जास्त नामांकित डॉक्टर, मेडिकल स्टाफ, मोफत दवाखाना आणि 13 रुग्णवाहिकांसह वारीमध्ये ठिकठिकाणी मेडिकल पॅम्प आयोजित करून चांगल्या दर्जाची मोफत औषधे दिली जाणार आहेत. संपका&साठी रवींद्र आवटी-9320022222, हसनखान मोकाशी-9702538156, प्रकाश बोरकर-9757376350, बाळासाहेब हाबडे-9324514646, अरविंद भोसले-9821581860.