`संविधान वाचवूया’ मोहिमेत सहभागी व्हा, गणेश देवी यांचे आवाहन

धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून देशाचे संविधान खिळखिळे करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी कार्यकत्र्यांना केले. महाराष्ट्रातील प्रागतिक साहित्यिक, कलावंत आणि विविध व्यावसायिकांनी गेल्या महिन्याभरापासून ‘अभ्यासक्रम संविधान’ ही मोहीम सोशल मीडियावर सुरू केली आहे. यासंदर्भात काल घेण्यात आलेल्या सहविचार सभेला मार्गदर्शन करताना डॉ. देवी बोलत होते.

सहविचार सभेला अॅड. राजेंद्र पै, सुभाष वारे, हेरंब कुलकर्णी, जयराज साळगावकर, सुषमा देशपांडे, अंजली कुलकर्णी, जालिंदर सरोदे, अल्लाउद्दीन शेख आदी उपस्थित होते. यावेळी सीबीएसई बोर्डाने देशाच्या संविधानातील महत्त्वाचे घटक, कोविडचे कारण देऊन यावर्षी अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेविरोधी निर्णयाचा पुनर्विचार करून या घटकाचा तत्काळ अभ्यासक्रमात समावेश करावा,

यासाठी महाराष्ट्रातील घटना संरक्षक नागरिकांनी म्प्स्स्-म्ेंॉहग्म्.ग्ह आणि स्ग्हग्ेूी.प्r्.ुदन्.ग्ह या पत्त्यावर ईमेल पाठवावेत, असे आवाहन मोहीमेचे समन्वयक शाहीर संभाजी भगत, डॉ. महेश केळुसकर, मारुती शेरकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या