गो कोरोना गो… म्हणत डॉक्टरच्या मुलाला केली रॉडने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

1497

कोरोना कालावधीत डॉक्टरी पेशा सांभाळून नागरिकांची सेवा करणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या मुलाला कोरोना झाल्याची अफवा परवित त्याला रॉडने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पाषाण रस्ता परिसरातील मंत्री अव्हेन्यु पंचवटी सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी अल्पवयीनासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल शिवबच्चन गिरी (वय 45), अमितकुमार गिरी (वय 40), सतीश रेगे (वय 60 सर्व रा. मंत्री अव्हेन्यू, पंचवटी, पाषाण रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोहम घोरपडे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. स्नेहा सम्राट घोरपडे (वय 47) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. स्नेहा पती आणि मुलासह मंत्री अव्हेन्यू, पंचवटी सोसायटी राहायला आहेत. त्या रेडिओलॉजिस्ट म्हणून औंध आणि वाकडमध्ये प्रॅक्टिस करतात. 16 जूनला सोसायटीतील रहिवाशी सतीश रेगे यांनी सर्वाना मेसेज पाठवून कोरोना रुग्णाची माहिती देण्याचे सांगितले. त्यानुसार डॉ. स्नेहा यांचे पतीन सम्राट यांनी सतीशला फोन केला असता, तुमचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असून तुम्ही त्याच्यावर घरीत उपचार करीत असल्याचे सांगत त्यांनी सोसायटीत अफवा पसरविली. त्यावेळी सम्राट यांनी त्यांना मुलगा पॉझिटिव्ह नसल्याचे सांगितले.

सोसायटीतील एका पॉझिटिव्ह रुग्णांकडून डॉ. स्नेहा यांच्या मुलाने पुस्तके आणली होती. त्यामुळे इतर रहिवाशांकडून त्यांच्या मुलावर कोरोनाचा संशय घेण्यात येत होता. त्यामुळे त्यांनी मुलाची खासगी रुग्णालयात तपासणी करुन 15 दिवस घरातच ठेवले. त्यानंतर 23 जूनला सोहमला एकाने खाली बोलाविले. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाल्यामुळे अल्पवयीन मुलाने सोहमला रॉडने मारहाण केली. त्यामुळे सोहमला आठ टाके पडले. त्यामुळे त्याला उपचाराला नेताना अनिल आणि अमितकुमार गिरी जो डरते है, वो चोर है, गो कोरोना गो असे म्हणत दरवाजाबाहेर थुंकले. त्यानंतरही अनिल, अमित यांनी सोहम कोविड पेशंट असून त्याचावर बहिष्कार घाला, त्याला मारहाण करा असे सांगत अफवा परविली.

मुलाला कोरोना झाल्याची अफवा पसरविल्यासह मारहाण केल्याप्रकरणी अल्पवयीनासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहे.
– राकेश सरडे, पोलीस उपनिरीक्षक

आपली प्रतिक्रिया द्या