पेटीवर गायकाला दिली कुत्र्याने साथ

18590

पोपट, डॉल्फिन्स, मांजरी असे काही प्राणी माणसाचे अनुकरण करतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र सध्या एका कुत्र्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्या व्हिडीओमध्ये तो एका माणसाबरोबर गाणे गात आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे आणि हा व्हिडीओ कोणी बनवला हे अद्याप समजू शकले नाही. यापूर्वीही अशा प्रकारचे प्राणी अनुकरण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये बसलेला एक माणूस पेटीवर ‘तेरी मेरी कहानी…’ हे बॉलीवूड मधील गाणे गात असताना दिसत आहे. त्याचवेळी, त्याच्याबरोबर दारात उभा असलेला एक तपकिरी आणि पांढरा रंगाचा कुत्रा त्या माणसाबरोबर गाणी गात आहे. मधेच हा कुत्रा आपले पाय उंचावत आहे. तो कुत्रा या गाण्यांचा आनंद घेत असल्याचे दिसते.

हा व्हिडीओ सुबीर खानने नावाच्या माणसाने त्याच्या फेसबुकवर पोस्ट केला होता त्यानंतर आतापर्यंत 54 हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला 23 हजार लाईक्स आणि 127 कमेंट आल्या आहेत.

हा व्हिडीओ पोस्ट करताना ‘अजिबात हसू नका, आज सकाळी मी आणि ‘बाघा’ संगीताचा सराव करत होतो’, अशा आशयाचा संदेश बंगाली भाषेत लिहिलेला होता.

आपली प्रतिक्रिया द्या