
मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका कुत्रीच्या गुप्तांगात अज्ञात व्यक्तीने काठी घातली आहे. त्यात कुत्री गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. देवी शेठ आणि त्यांची कन्या मिनू यांना व्हॉट्सॅपवर एक व्हिडीओ आला होता. त्यात नुरी ही कुत्री रक्ताच्य थारोळयात पडली होती. पवई मॉलच्या जवळ नुरी पडली होती आणि येणारे जाणार्या लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.
आई आणि मुलीने तातडीने घटनास्थळी धाव घेत प्राण्यासांठी काम करणार्या एका स्वयंसेवी संस्थेला पाचारण केले. संस्थेने रुग्णवाहिकेतून नुरीला प्राण्यांच्या इस्पितळात दाखल केले. उपचारादरम्यान नुरीच्या गुप्तांगातून तब्बल 11 इंचाची एक लाकडाची काठी बाहेर काढण्यात आली. डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली पण अजूनही तिची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांन चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


























































