
सामना ऑनलाईन, मुंबई
रुपयाच्या दरात आज मोठी घसरण झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 113 पैशांनी गडगडला. गेल्या पाच महिन्यांतील रुपयाची ही सर्वाधिक घसरण आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी घेतलेली माघार, चिनी चलन युआनचे अवमूल्यन आणि हिंदुस्थानात कश्मीरबाबत सुरू असलेली चर्चा अशी अनेक कारणे रुपया घसरण्यामागे सांगितली जात आहेत. ऑगस्ट 2013 नंतर एका दिवसात इतक्या मोठय़ा प्रमाणात रुपयाचे अवमूल्यन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या डिसेंबरपासून रुपयाच्या दरात घसरण होत आहे.


























































