
डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर व त्यांची पत्नी ट्विंकल भोईर यांनी आज शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

































































