ट्रम्प सरकारला सुचलेले शहाणपण, शैक्षणिक व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे

अमेरिकन भूमिपुत्रांना देशातील शिक्षणात आणि रोजगारात प्रथम पसंती मिळावी या उद्देशाने अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने विदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व्हिसा यंदाच्या वर्षासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.पण या निर्णयाविरोधात अमेरिकन विद्यापीठांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांनंतर ट्रम्प प्रशासनाने शैक्षणिक व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आपल्या मायदेशी परतण्याची भीती निर्माण झालेल्या लाखो विदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा लाभला आहे.त्यात हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचाही मोठय़ा संख्येने समावेश आहे.

10 लाख विद्यार्थ्यांना दिलासा
सध्याच्या घडीला अमेरिकेत 10 लाखाहून अधिक परेदशी विद्यार्थी विविध शिक्षण संस्थेत शिक्षणाचे धडे घेत आहेत. तर एका अहवालानुसार हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाख 94 हजार 556 इतकी आहे. आता या निर्णयामुळे या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या