
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्यातील जिगरी मैत्री आता संपुष्टात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’च्या रोझ गार्डनमध्ये तंत्रज्ञानातील व्यावसायिकांसाठी खास डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. मात्र या डिनर पार्टीचे निमंत्रण मस्क यांना देण्यात आले नाही. या रोझ गार्डनचे नुकतेच काम करण्यात आले असून यानंतर या ठिकाणी होणार हा पहिलाच कार्यक्रम आहे. या डिनर पार्टीला मेटाचे सीईओ मार्प झुकरबर्ग, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, बिल गेट्स यांच्यासह मोठे उद्योगपती उपस्थित राहणार आहेत.
मस्क आणि ट्रम्प यांची मैत्री जगभरात प्रसिद्ध होती, परंतु अमेरिकन सरकारने आणलेल्या एका ईव्हीला देणाऱ्या सबसिडी विधेयकामुळे या दोघांतील मैत्री संपली आहे. याआधी मस्क हे ट्रम्प यांचे सल्लागार होते.
या डिनर पार्टीला मस्क यांना निमंत्रण दिले नसले तरी मस्क यांचे जवळचे सहकारी जेरेड इसाकमन यांना निमंत्रण पाठवले आहे. ट्रम्प यांनी त्यांची नासाच्या अंतराळ संस्थेच्या नेतृत्वासाठी निवड केली होती. ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद निर्माण झाल्यावर इसाकमन यांचे नामांकन रद्द करण्यात आले होते. हा डिनर अचानक घेण्याचा निर्णय घेतला आहे.