ट्रम्प यांच्या ‘त्या’ वादग्रस्त पोस्टवरून थेट मार्क झुकरबर्गला नडला, फेसबुकने कामावरून काढला

3274
8) मार्क झुकेरबर्ग - 62.3 अब्ज डॉलर

एका कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येनंतर अमेरिकेत मोठी दंगल उसळली होती. याविरोधात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. यावर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ट्रम्प यांचा बचाव करत पोस्टवर कारवाई करण्यास नकार दिला होता. झुकरबर्ग यांच्या या निर्णयाचा अनेक कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. यातील एक ब्रँडेल डायल याने कठोर शब्दात झुकरबर्गवर निशाणा साधला होता. थेट झुकरबर्गला नडलेल्या ब्रँडलला फेसबुकने नारळ दिला आहे.

ब्रँडेल डायल हा फेसबुकच्या सीएटल ऑफिसमध्ये युजर इंटरफेस इंजिनियर पदावर कार्यरत होता. त्याने स्वतः आपल्याला फेसबुकने कामावरून काढल्याचे ट्विटरवर सांगितले आहे. विशेष म्हणजे ब्रँडेल यांच्यासह त्याच्या टीममधील अन्य 6 इंजिनियरसह जवळपास डझनभर कर्मचाऱ्यांनी झुकरबर्गच्या मौनाविरोधात सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती. यावर त्यांना कंपनीने उत्तर देण्यास सांगितले होते.

चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवल्याने नोकरी गमवावी लागली, असे ब्रँडेल म्हणाला. फेसबुकने देखील त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास कंपनीने नकार दिला आहे. सीईओविरोधात आवाज उठवल्याने ही कारवाई झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

काय आहे प्रकरण?
अमेरिकेत एका पोलिसाने कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड याला एका दुकानात नकली बिल दिल्याच्या संशयातून अटक केली होती. पोलिसाने आपला गुढघा त्याच्या मानेवर तब्बल 8 मिनिटं दाबून ठेवल्याने जॉर्ज याचा गुदमरून मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण अमेरिकेत हिंसक आंदोलन सुरू झाले. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जेव्हा लूटमार सुरू होते, तेव्हा गोळीबार सुरू होतो’, अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या