
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बहुप्रतीक्षित ‘गोल्ड कार्ड’ व्हिसाची घोषणा केली. या अंतर्गत एक मिलियन डॉलर म्हणजेच 8.97 कोटी रुपये भरून एखाद्या व्यक्तीला अमेरिकी नागरिकत्व मिळवता येणार आहे.
सुरुवातीला या कार्डची किंमत 5 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 44 कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती, मात्र त्यात कपात करून ती 9 कोटींवर आणली आहे.


























































