
हवाई हल्ल्यांनंतर आता अमेरिका-इस्रायलने जमिनीवरचे युद्ध लढण्याची तयारी सुरू केली असून तब्बल साडे तीन हजार सैनिक आखातामध्ये पाठवले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. अमेरिकन सैन्याने इराणमधील महत्त्वाच्या तळांना यशस्वीपणे नष्ट केले आहे. या तळांचा शोध अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून घेत होती. हे मोठे यश आहे, असे ट्रम्प म्हणाले. तसेच त्यांनी इराणमध्ये सत्तापालट झाल्याचाही दावा केला.
इराणसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. जगातील सर्वात शक्तिशाली आणि घातक अशा आमच्या सैन्याने अनेक मोठ्या तळांना नष्ट केले आहे. या तळांचा शोध आम्ही बऱ्याच काळापासून घेत होतो. तिथे सत्तापालत झाला असून इराणसोबत लवकरच मोठा करार होण्याची आशा प्रज्वलित झाली आहे. कदाचित हे खूप लवकर घडेल, असे ट्रम्प यावेळी म्हणाले.
‘एअर फोर्स वन’ विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालट झाल्याचे सूचक विधान केले. तिथे आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही आता अशा लोकांशी व्यवहार करत आहोत, ज्यांचा सामना यापूर्वी कोणीही केला नव्हता. हा पूर्णपणे वेगळा गट आहे, त्यामुळे मी याला सत्तापालटच मानतो, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी इराणसोबत लवकरच करार होण्याची शक्यताही बोलून दाखवली.
#WATCH | US President Donald J Trump says, “… I can’t define it exactly, but they (Iran) gave us, I think as a sign of respect, 20 boats of oil, big, big boats of oil going through the Hormuz Strait. That’s taking place starting tomorrow morning, over the next couple of… pic.twitter.com/ZAD0T9Ao4U
— ANI (@ANI) March 30, 2026
आम्ही अमेरिकन सैन्याची वाट पाहतोय!
इराणच्या संसदेचे अध्यक्ष एम. बी. गालिबफ यांनी अमेरिकेवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. अमेरिका एकीकडे मुत्सद्देगिरीच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे छुपे हल्ले करते. आमचे लोक जमिनीवर अमेरिकन सैनिकांची वाट पाहत आहेत, जेणेकरून त्यांना आगीच्या स्वाधीन करता येईल, असा इशारा गालिबफ यांनी दिला आहे.
Iran War – होर्मुझ सामुद्रधुनीतील टोल दोन मिनिटांत बंद करु शकतो, ट्रम्प यांचा इराणला इशारा
युद्ध लांबण्याची चिन्ह
दरम्यान, इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षाला आता पाच आठवडे पूर्ण झाले आहेत. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो कोटी रुपयांची वित्तहानी झाली आहे. अमेरिकेने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले असून आखातातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र, ड्रोनने हल्ला चढवला आहे. तसेच जगातील तेल आणि वायू पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझ सामुद्रधुनी हा जलमार्ग इराणने रोखला आहे.

























































