
सामना ऑनलाईन, मुंबई
डोंगरी येथील केसरभाई इमारत दुर्घटनेप्रकरणी डोंगरी पोलिसांनी इमारतीचे ट्रस्टी, कॉण्ट्रक्टर आणि इमारत रिकामी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डोंगरी पोलिसांनी इमारत दुर्घटनेप्रकरणी 304 (अ), 34 आणि अन्य कलमांन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


























































