पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील दानशूरांनी पुढे यावे- पालकमंत्री डॉ. संजय कुटे

264

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वत: प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या पुराचा फटका बसलेल्या हजारो नागरिकांसाठी शासनाच्या तर्फे ३०० च्या वर कॅम्प सुरू आहेत. पाऊस थांबल्यामुळे हळू हळू पूर परिस्थतीत नियंत्रांनात येत असून विस्थापितांना मदत पोहोचविण्याचे कार्य जोमाने सुरू झाले असून ती मदत गरजूंना मिळावी या करिता पुणे विभागाचे आयुक्त मार्फत सदर मदत योग्य नागरिकांना देण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था सह ज्या कोणाला पूरग्रस्तांना मदत द्यायची आहे त्यांनी आपली किराणा, कपडे, ब्लँकेट, पाणी, चारा अशा प्रकारची मदत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणाशी संपर्क करूनच द्यावी. तसेच ज्या दानशूर व्यक्तींना आर्थिक स्वरूपात मदत देणे आहे त्यांनी आपले धनादेश हे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत तयार करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करावे. जिल्ह्यातील ज्या डॉक्टर मंडळींना पूरग्रस्त भागात वैद्यकीय सेवा द्यायची आहे त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुणे आयुक्त मार्फत दिलेल्या ठिकाणी जाऊन सेवा कार्य करावे. राज्यातील कोणत्याही संकट समयी मदत करण्यासाठी धावून जाण्याची बुलढाणा जिल्ह्याची नेहमीच परंपरा राहलेली आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, डॉक्टरांसह सगळ्यांनी मदत करावी असे आवाहन पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या