
रेशनकार्ड बंद पडण्यापासून वाचवण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक केले आहे.
मात्र या e-KYC साठी आता रेशन दुकानात चकरा मारण्याची गरज नाही.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘Mera eKYC’ अॅपच्या मदतीने घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची केवायसी करणे सहज शक्य झाले आहे.
तुमच्या गुगल प्ले स्टोअरवरून ‘e-KYC आणि ‘Aadhar FaceRD’ हे दोन्ही अॅप्स डाऊनलोड करा.
भाषा आणि राज्य निवडा. त्यानंतर मुख्य सदस्याचा आधार क्रमांक टाका.
आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
लॉगिन होताच स्क्रीनवर रेशनकार्डमधील सर्व सदस्यांची नावे दिसतील.
‘Face e-KYC’ या पर्यायावर क्लिक करा.
चेहरा मॅच झाल्यानंतर सदस्याची माहिती येईल.
‘Submit’ बटणावर क्लिक करताच तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

























































