पेपरफुटीचा विषय हलक्यात घेऊ नका, त्यावर मार्ग काढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पर्धा परीक्षांत होणारी पेपरफुटी हा एक गंभीर विषय आहे. हा आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पेपरफुटीचा विषय हलक्यात घेऊ नका. त्यावर मार्ग काढा, अशा शब्दांत एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सरकारवर हल्ला चढवला.

पेपरफुटी झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा भविष्यात पेपरफुटी होणारच नाही, यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन किंवा प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरणे देऊन प्रश्न सुटणार नाही. पेपर फुटण्याचे प्रकार कसे थांबतील, यावर सरकारने काम केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे अनेक लोकांसोबत पह्टो असतात. त्यामुळे एखादा पह्टो कुणासोबत आहे, हा मूलभूत प्रश्न नाही. तर आज सत्तेत कोण आहे आणि त्यांच्या काळात वारंवार पेपरफुटी का होते, हा प्रश्न महत्त्वाचा आहे असे सुप्रिया सुळे एमपीएससी व्हायरल फोटोबाबत म्हणाल्या.