सावधान…ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी आलाय प्राणघातक विषारी साप; सतर्कतेचे आवाहन

ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलॅंड समुद्रकिनारी एक प्राणघातक विषारी सागरी साप वाहून आला आहे. या सागरी सापापासून सावधान राहण्याचे तसेच समुद्रकिनारी गेल्यास सतर्कता बाळगण्याचे आवाहन ड्रू गॉडफ्रे या सर्पतज्ज्ञाने केले आहे. त्याने या विषारी सापाबाबतची माहितीही दिली आहे.

क्वीन्सलँडमधील समुद्रकिनारी हा विषारी सागरी साप पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आला. हा साप समुद्रकिनारी दिसल्यावर सर्पतज्ज्ञ गॉडफ्रेला याची माहिती देणयात आली. तो लगेच घटचनास्थळी दाखल झाला. त्याला हा साप विषारी आणि प्राणघातक असल्याचे समजले. त्यामुळे त्याने याबाबत सावधानतेचे आवाहन केले आहे.

या सागरी सापाविषयी सर्पतज्ज्ञ गॉडफ्रे म्हणाला की, हा सागरी साप विषारी असून तो कुपोषित होता. त्याला बरेच महिने काहीच खायला मिळाले नसावे, अशी माहिती त्याने दिली. कुपोषणामुळे त्याची त्वचाही रखरखीत झाली आहे. तसेच या  सापाममध्ये वेगळेपण असल्याचेही त्याने सांगितले. हा साप जखमी आणि कुपोषित असल्याने त्याला वैद्यकीय चाचणी आणि उपचाराकरिता ऑस्ट्रेलियाच्या प्राणीसंग्रहालयात नेण्यात येणार आहे. हा साप कुपोषित असल्याने सध्या तो समुद्रात पोहण्यासाठी सक्षम नसल्याचेही आढळून आले आहे.

सर्वसाधारणपणे समुद्री साप प्राणघातक आणि विषारी असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते दंश करत नसले तरी ते जेव्हा जखमी होतात किंवा कुपोषित असतात, तेव्हा ते सुरक्षेसाठी हल्ला चढवू शकतात किंवा दंश करू शकतात. त्यामुळे त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच समुद्री साप शक्यतो पाण्याबाहेर येत नाहीत. मात्र, हा साप जखमी आणि कुपोषित असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत तो किनाऱ्यावर आल्याचे गॉडफ्रे यांनी सांगितले. या सापासारखे आणि काही विषारी साप समुद्रकिनारी येण्याची शक्यता असल्याने त्यांनी नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि समुद्रकिनारी आल्यास सतर्क राहवे, असे आवाहन केले आहे.