
पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील हार्बरमार्गावर माहीम स्थानकांत वळणदार मार्गाला सरळ करण्यासाठी गेल्या रविवारी अभियांत्रिकी काम हाती घेण्यात आले असून सोमवार 13 ते 26 जूनपर्यंत डाऊन लोकल थांबणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माहीम रेल्वे स्थानकातील मार्ग वक्राकार असल्याने लोकल गाड्यांच्या वेगावर परिणाम होत होता. त्यामुळे येथे रविवारी वळणदार रूळांचा मार्ग सरळ करण्यासाठी मोठा ब्लॉक घेण्यात आला. अप मार्गावर माहीम आणि वांद्रे जंक्शनच्या दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकचे काम संपल्यानंतर हार्बरच्या ट्रेन 15 दिवसांपर्यंत माहीम स्थानकांवर थांबणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. माहिमला उतरणार्या प्रवाशांना अप दिशेला वांद्र्याहून प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे. येथील कव्हर्् हटविण्यात येऊन नवीन अलायमेंट टाकल्यावर लोकलच्या वेगातही वाढ होणार आहे.

























































