
>> डॉ. अनिल कुलकर्णी
काही पुस्तके वाचायलाच हवीत. कारण पुस्तके प्रेरणा देतात, संघर्षात जगायला शिकवतात आणि संघर्ष माणसाला घडवतो. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढग काही काळ अवकाश व्यापून राहतात पण जेव्हा बरसतात ते अंकुरसोबत घेऊन आसमंत उजळून टाकतात.
प्रतिकूल परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी 3000 स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून त्या जटा काढतच नसत.
दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱयांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासी प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.
1996 मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना झाली. इन्फोसिस फाऊंडेशन सुरू करण्याची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणे ही होती. म्हणजेच ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’. गरजवंताची जात, धर्म, भाषेचा विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणे हे फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट होते.
‘देवदासी’ या शब्दाचा खरं तर अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे. पूर्वीच्या काळी देवदासी गायन, वादन, नृत्य अशा कलांत निपुण असत. कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची उपासना करत. पण काही दिवसांनी ‘देवदासी’ या शब्दाला ‘शरीरपाय करून उदरनिर्वाह करणारी स्त्राr’ असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. ज्या देवदासीच्या पोटी जन्माला आल्या त्याही पुढे देवदासी बनल्या. काही मुलींना त्यांचे आईवडीलच वेगवेगळ्या कारणाने देवाला अर्पण करायचे. दारिद्रय़ाने अस्वच्छ, अनारोग्यपूर्ण राहणीमुळे एखाद्या मुलीच्या केसात जट आली की, ती देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे असा साक्षात देवानेच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिचे देवाच्या चरणी सेवेसाठी लग्न करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली.
देवदासी समस्येचे काम सुधा मूर्तींनी हातात घेतले. संवाद साधणे अतिशय अवघड होते. त्यांनी खूप अपमान सहन केले. “तुम्ही काय सरकारी दलाल आहात का?” वगैरे त्यांची हेटाळणी झाली. त्यांच्या अंगावर चपला फेकून मारल्या गेल्या तरी त्या डगमगल्या नाहीत.
केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही, तर या स्त्रियांचे आत्मसन्मानाने मनोबल वाढवण्याची गरज आहे हे सुधा मूर्तींना कळून चुकले. मग त्यांनी व देवदासींनी एकत्र येऊन एक संघटना उभी केली. परमेश्वराला काही सगळीकडे उपस्थित राहणे शक्य नसते. म्हणून तो काही काही व्यक्तींच्या रूपाने मदतीला धावून येतो या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास होता.
या उपामाचे यश म्हणजे तीन वर्षांच्या आत बँकेकडे डिपॉझिट स्वरूपात ऐंशी लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली, परंतु या उपामाचे सर्वात मुख्य यश म्हणजे 3000 देवदासी शरीरपाय व्यवसायातून बाहेर पडल्या. अनेकांची मुलं शिकून, मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली. त्यात डॉक्टर, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बँक अधिकारी असे सगळे होते.
देवदासी प्रथेतून बाहेर पडलेल्या महिलांनी एका कार्पामामध्ये भरतकाम केलेली गोधडी सुधा मूर्ती यांना भेट दिली. तीन हजार टाके घातलेल्या या गोधडीवर सुंदर नक्षीकाम नसलं तरी त्याला प्रत्येकीचा हात लागला होता. त्यात मायेची ऊब होती.
आपल्या मनोगतात त्या म्हणतात, “ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट आहे. हे पांघरूण तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल. आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही.” सुधा मूर्ती म्हणतात, आजवर मला मिळालेली ही सर्वात सुंदर भेट आहे.
सुधा मूर्तींच्या शब्दांत सांगायचं झालं तर “मानवी स्वभावाचे सर्व पैलू नीट समजावून घेणं आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदतीचा हात देऊन त्यांना त्या संकटातून बाहेर काढणं हेसुद्धा आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकतं. आपण सगळेच आयुष्यात छोटय़ा छोटय़ा लढाया जरी हरलो तरी महासंग्राम जिंकू शकतो. आयुष्यात आशेला नेहमीच स्थान असतं.”
व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार करायचा असेल तर कोषातून बाहेर यायलाच हवं. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वानेच बदलाची प्रािढया सामूहिक व्हायला सुरुवात होते.
काही पुस्तके, काही माणसे आजच्या पिढीला माहीत व्हायलाच हवीत.





























































