डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेला वडिलांच्या दशक्रियाला जाण्यास परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी रत्नागिरीत जाण्याची परवानगी मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या आरोपी विक्रम भावेची विनंती न्यायालयाने गुरुवारी मान्य केली. विक्रम भावे याला 10 ऑगस्टपर्यंत पुण्यात परतण्याचे आदेश न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी विक्रम भावेला अटक करण्यात आली होती.

20 ऑगस्ट 2013 साली पुणे येथे डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात आरोपी शरद कळसकर, सचिन अंदुरे यांना मदत केल्याप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला अटक केली. उच्च न्यायालयाने भावेचा 6 मे रोजी अटीशर्तीसह एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता, मात्र पुणे जिल्हा सोडून जाण्यास त्याच्यावर बंदी घातली होती.