डॉ. विजय देव यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

राज्यशास्त्राचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक आणि स.प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (78) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गो.नी. दांडेकर यांचे जावई आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक म्हणून डॉ. देव परिचित होते. स.प. महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे 35 वर्षे अध्यापन केले. दोन वर्षे प्राचार्य पद भूषवून ते निवृत्त झाले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. दरम्यान, विजय देव यांनी आयुष्यभर सरस्वतीची सेवा केली, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देव यांना श्रद्धांजली अर्पण केली.