राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची वाघशीर पाणबुडीतून सफर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हिंदुस्थानी नौदलाच्या ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीतून समुद्र सफरीचा अनुभव घेतला. कर्नाटकच्या कारवार नौदल बंदरावरून त्यांनी समुद्र सफरीला सुरुवात केली. तब्बल दोन तास त्यांनी पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. राष्ट्रपतींनी यावेळी अधिकारी आणि पाणबुडीवरील जवानांशी चर्चा केली व त्यांच्या कामाची माहिती घेतली.