कोरोनाशी लढण्यासाठी DRDO ने बनवले मास्क, N95 पेक्षाही सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाशी लढण्यासाठी DRDO ने एक मास्क बनवले आहे. या मास्कला N99 नाव देण्यात आले असून ते N95 पेक्षाही अधिक सुरक्षित आहे. या मास्कची निर्मिती ग्वालियरच्या लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आली आहे. या मास्कमध्ये सुरक्षेचे पाच्च लेयर असून दोन नॅनो वेबचा समावेश आहे. कापड मंत्रालयासह दोन खासगी कंपन्या या मास्कची निर्मिती करतील. या कंपन्या मुंबई आणि कोलकात्यात आहेत.

DRDO चे महासंचालक एके सिंह म्हणाले की लवकरच हे मास्क सरकारी संस्थांकडे सुपुर्द केले जातील. नुकतंच DRDOने खास सॅनिटायझर आणि साफ सफाईसाठी डिसइन्फेक्ट तयार केले आहेत. हे उत्पादन काही सरकारी संस्थामध्ये वापरण्यास सुरूवात केली आहे. 20 हजार लिटर सॅनिटायझर दिल्ली पोलिसांना वितरित करण्यात आले आहे.   DRDO ने बनवलेले उत्पादन देशातही वितरित होणार आहेत.