
अनेकदा बाहेरुन आल्यावर उभ्याउभ्याच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. मात्र ही सवय धोकादायक ठरु शकते. त्यावेळी तहान भागते मात्र तसं पाणी प्यायल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने हृदय विकारासह अनेक आजारांना आपण आमंत्रण देतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते पाणी पिताना कायम ते नीट खाली बसून प्यायला हवे. एवढेच नव्हे तर पाणी जास्त थंड पिऊ नये आणि ते एका श्वासात गिळू नये. पाणी एकदम न पिता एक-एक घोट प्यावे. यामुळे शरीराची लय बिघडत नाही आणि पाणी पिण्याचा फायदा शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो.
उभे राहून पाणी प्यायल्याने होणारे नुकसान
– आपल्या शरीरातील पाण्याला फिल्टर करण्याचे काम किडणीचे असते. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी किडनीमधून योग्य रीतीने फिल्टर न होता वाहून जाते. वेळेसोबतच मूत्राशय आणि रक्तामध्ये विषारी द्रव्य जमू लागते. जर हीच स्थिती जास्तवेळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.
– उभ राहून पाणी प्यायल्याने अन्नपचन योग्यरित्या न होता अन्नाचे कोलेस्टेरॉलमध्ये रूपांतरित होऊ लागते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
– शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडू लागते. त्यामुळे सांध्यांना पुरेसा द्रव मिळत नाही, ज्यामुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होते.
– उभं राहून पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर विपरीत परिणाम होतो. त्याने अल्सरच्या समस्येचा धोका वाढू शकतो.
– अन्नाची नीट पचनक्रिया न झाल्याने कफाचा त्रास होण्याची शक्यता असते.
– अन्नाचे पचन नीट न झाल्यास बद्धकोष्ठतेची समस्या असू शकते
– उभे राहून पाणी प्यायल्याने शरीर आम्लावर (ऍसिड) संतुलन करू शकत नाही. शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त आम्ल तयार होऊन अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.



























































