
लाल समुद्रात हिंदुस्थानचा झेंडा असलेल्या गॅबनच्या मालकीच्या एमव्ही साईबाबा या जहाजावर ड्रोनहल्ला झाल्याचे समोर आले आहे. हा हल्ला येमेनमधील हुथी हंडखोरांनी केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. जहाजावर कोणतीही जीवितहानी झालेली नसून या जहाजाने या भागात गस्तीवर असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेला आपत्कालीन संदेश पाठवला होता. त्यानंतर यूएस सेंट्रल कमांडने एक्स अकाऊंटवरून हल्ल्याबाबतची माहिती शेअर केली.
दरम्यान, जहाजावर असलेले 25 हिंदुस्थानी कामगार सुरक्षित असल्याचे हिंदुस्थानी नौदलाने स्पष्ट केले आहे.
त्यानंतर हिंदुस्थानचा झेंडा असलेल्या आणखी एका जहाजावर लाल समुद्रात हल्ला झाला. त्यानंतर हिंदुस्थानी नौदल सतर्क झाले आहे. लाल समुद्राच्या दक्षिणेकडे प्रवास करत असताना दोन जहाजांवर हल्ला झाल्याचे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे.
























































