साहेब, वास्तविक अहवाल द्या!परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

36
जगातील 85 टक्के लोक दुष्काळी भागात राहतात

सामना ऑनलाईन ,परळी वैजनाथ

बीड जिल्हय़ात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आज गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील रेवली येथे दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आले. या पथकाने तालुक्यातील रेवली गावास भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकरी व नागरिकांशी संवादही साधला. तसेच एका  ठिकाणी कापसाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ‘साहेब, दुष्काळाचा वास्तविक अहवाल द्या हो’ असा टाहो फोडला. दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. साहेब, आम्ही दुष्काळी परिस्थितीने उद्ध्वस्त झालो आहोत. सरकारला वास्तविक अहवाल द्या हो अशी विनवणी शेतकऱ्यांनी पथकाला केली.

आपली प्रतिक्रिया द्या