कोल्हापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; जिह्यात ऊन-पावसाचा खेळ; नद्यांचे पात्र खालावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याकडून पावसाचे दररोज ‘ऑरेंज’, ‘यलो अलर्ट’चे अंदाज देण्यात येत असले, तरी कोल्हापूर जिह्यात पावसाची हुलकावणीच पाहायला मिळत आहे. शहरासह जिह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने शेतकरी पेरणीसाठी खोळंबला असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यास पाटबंधारे विभागाला मेळ लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या पावसाने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र नद्यांनी तळ गाठला आहे. 39 फूट इशारापातळी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी सध्या अवघ्या आठ फुटांवर आहे. एकंदरित पावसाने दडी मारल्यास कोरडय़ा दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने यंदाही महापुराचे संकेत दिले होते. पण जून संपत आला तरी पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या 20 दिवसांत तब्बल 255 मिमी पाऊस झाला होता. यंदा केवळ 79 मि.मी. झाला आहे. बुधवार दि. 8 जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज होता; पण अपेक्षित पाऊस झाला नाही. आता बुधवारपासून सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून, सर्वत्र उत्तम पाऊस होण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाची सध्या हुलकावणी पाहाता अंदाज बांधणे कठीण झाले आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाळा अनुभवावा लागत आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. हवामान विभागाने दोन दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काल रविवार सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण राहिले. सकाळी पाऊस दुपारी ऊन आणि सायंकाळी पुन्हा पाऊस झाला. आज दुसऱया दिवशीही असेच वातावरण राहिले.

गतवर्षीपेक्षा यंदा 176 मि.मी. कमी पाऊस
कोल्हापूर जिह्यात गेल्या वर्षी 20 जूनपर्यंत सरासरी पावसाची नोंद 255 मिमी आहे. यंदा आतापर्यंत केवळ 79 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 176 मि.मी.पाऊस कमी आहे.कोल्हापूर, दि. 20 (प्रतिनिधी) – हवामान खात्याकडून पावसाचे दररोज ‘ऑरेंज’, ‘यलो अलर्ट’चे अंदाज देण्यात येत असले, तरी कोल्हापूर जिह्यात पावसाची हुलकावणीच पाहायला मिळत आहे. शहरासह जिह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने शेतकरी पेरणीसाठी खोळंबला असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यास पाटबंधारे विभागाला मेळ लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या पावसाने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र नद्यांनी तळ गाठला आहे. 39 फूट इशारापातळी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी सध्या अवघ्या आठ फुटांवर आहे. एकंदरित पावसाने दडी मारल्यास कोरडय़ा दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने यंदाही महापुराचे संकेत दिले होते. पण जून संपत आला तरी पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या 20 दिवसांत तब्बल 255 मिमी पाऊस झाला होता. यंदा केवळ 79 मि.मी. झाला आहे. बुधवार दि. 8 जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज होता; पण अपेक्षित पाऊस झाला नाही. आता बुधवारपासून सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार असून, सर्वत्र उत्तम पाऊस होण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाची सध्या हुलकावणी पाहाता अंदाज बांधणे कठीण झाले आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाळा अनुभवावा लागत आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. हवामान विभागाने दोन दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काल रविवार सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण राहिले. सकाळी पाऊस दुपारी ऊन आणि सायंकाळी पुन्हा पाऊस झाला. आज दुसऱया दिवशीही असेच वातावरण राहिले.

गतवर्षीपेक्षा यंदा 176 मि.मी. कमी पाऊस
कोल्हापूर जिह्यात गेल्या वर्षी 20 जूनपर्यंत सरासरी पावसाची नोंद 255 मिमी आहे. यंदा आतापर्यंत केवळ 79 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 176 मि.मी.पाऊस कमी आहे.

राधानगरी धरणात 22 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
कोल्हापूर जिह्यात अतिवृष्टीमुळे सलग तीन वर्षे महापुराचे संकट ओढवले होते. त्यावेळी झालेली हाणी तसेच यावेळी पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदा धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे, पाटबंधारे विभागास आव्हानात्मक बनले आहे. पाऊस वेळेत न आल्यास पाणीसाठय़ाची स्थिती गंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी राधानगरी धरणाचा पाणीसाठा 87.31 दलघमी होता, तो यावर्षी 64.83 दलघमी आहे. एकूण 8.361 पैकी 2.29 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण 27 टक्के शिल्लक पाणीसाठय़ापैकी केवळ 22 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याशिवाय जिह्यातील मोठे, मध्यम व लहान धरण प्रकल्पांमध्ये तुळशी 42 पैकी 38, वारणा 31 पैकी 14, काळम्मावाडी 24 पैकी 20, कासारी 21 पैकी 20, कडवी 28 पैकी 27, कुंभी 38 पैकी 37, पाटगाव 26, चिकोत्रा 46, चित्री 32 पैकी 31, जंगमहट्टी 42 पैकी 40, घटप्रभा 2, जांबरे 39, आंबेहोळ 51 पैकी 47, को.दे.लपा 9 पैकी 7 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

दरम्यान, सध्या तुळशीमधून 200, वारणा 586, काळमवाडी 750, कासारी 125, कुंभी आणि पाटगाव प्रत्येकी 300 तसेच चित्री 180 आणि जांबरे प्रकल्पातून 40 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पात्रात पाणी दिसत आहे.