ड्रग्ज केस – कॉमेडियन भारती आणि पती हर्षला जामीन मंजूर

ड्रग्ज केसमध्ये तुरुंगात असलेली कॉमेडियन भारती सिंग आणि पती हर्षला किल्ला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. शनिवारी (21 नोव्हेंबर) रोजी एनसीबीने भारतीच्या मुंबई येथील घरी छापेमारी केली होती. ज्यात त्यांना गांजा सापडला होता. यानंतर झालेल्या चौकशी दरम्यान भारती सिंगने आपण ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली.

भारती सिंग आणि हर्षची 6 तास चौकशी केल्यानंतर त्यांना एनसीबीने अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना रविवारी कोरोना आणि वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्यात आलं होतं. जेथून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

भारती आणि हर्ष याला ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या किल्ला कोर्टाने 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. ज्यावर आज न्यायालयात सुनावली झाली असून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या