ड्रग्ज पेडलरला पाच वर्षांचा कारावास; 50 हजारांचा  दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास

नागपाडा पोलिसांनी एका सराईत ड्रग्ज पेडलरला चांगलाच दणका दिला आहे. गांजा तस्करी करताना रंगेहाथ सापडलेल्या त्या आरोपीविरोधात पोलिसांनी सबळ पुरावे सादर केल्याने त्याआधारे न्यायालयाने रेहान रईस कुरेशी याला पाच वर्षे सक्त कारावास व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिने सक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

वर्ष 2023 मध्ये नागपाडा पोलिसांनी रेहान कुरेशी याला गांजाची तस्करी करताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर उपनिरीक्षक शेख यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुह्याचा काwशल्याने तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. इतकेच नाही तर आरोपीला जामीनदेखील मिळवून दिला नव्हता.