जोगेश्वरीत ड्रग्ज तस्करला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गुन्हे शाखेच्या युनिट- 10 ने जोगेश्वरी येथे एका सराईत ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या. त्या तस्कराकडे पोलिसांनी 66 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा सापडला.

जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल परिसरात एक ड्रग्ज तस्कर येणार असल्याची खबर युनिट-10 मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भोईर, पोखरकर, एपीआय पठाण, डोपेवाड, महिला एपीआय खरात आणि पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून झाकिर शरिफुल्लाह सय्यद (30) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 66 ग्रॅम एमडीचा साठा सापडला. 1 लाख 32 हजार इतकी त्या एमडीची किंमत आहे.