मद्यधुंद अवस्थेत मॉडेलने केला तमाशा, लिफ्टमध्ये काढले कपडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

मुंबईतील ओशिवरा भागात एका मॉडेलने दारू पिऊन चांगलाच धिंगाणा घातला. मद्यधुंद अवस्थेत तिने स्वतःचे कपडेही काढले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेघा शर्मा असे या मॉडेलचे नाव असून बिल्डिंगच्या वॉचमनला तिने सिगरेट आणण्यास सांगितले त्याने नकार दिल्याने तिने हा तमाशा केला आहे.

ओशिवराच्या एका उच्चभ्रू इमारतीत मेघा शर्मा भाड्याने राहत होती. 25 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता मेघा शर्मा मद्यधुंद अवस्थेत खाली आहे व वॉचमनला सिगरेट आणण्यास सांगितले. वॉचमनने नकार दिल्याने मेघा शर्माचा पारा चढला आणि तिने वॉचमनला शिव्या घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. वॉचमनने शेवटी सोसायटीच्या सेक्रेटरीला बोलावले. सेक्रेटरीने 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. मेघानेही 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी आल्यावर मेघाने अजून आकांततांडव केले आणि कपडे काढण्यास सुरूवात केली.

पोलीस मेघाला पोलीस स्थानकात नेत होते परंतु मेघाने थयथयाट केला आणि कपडे काढण्यास सुरूवात केल्याने पोलिसही हतबल झाले. महिला पोलीस नसल्याने पोलीस निघून गेले. पोलिसांनी सध्या वॉचमन आणि सेक्रेटरीचा जबाब नोंदवला असून कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही.