शिवसेनाप्रमुखांचा आवाज रेकॉर्ड होतोय! ट्विटरवर तुफान प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

nawazuddin siddiqui as balasaheb thackeray

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित निर्माते संजय राऊत यांच्या ‘ठाकरे’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘ठाकरे’ चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम पूर्ण होऊन आता डबिंगचे काम सुरू झाले आहे. त्यावेळचा फोटो ट्वीट करत नवाजुद्दीन सिद्दीकीनं ही माहिती दिली आहे. त्या ट्वीटला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

देशात बाळासाहेबांसारखा नेता झाला नाही- नवाजुद्दीन सिद्दिकी

पुढल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा अनुभवण्यासाठी हिंदुस्थानचे तमाम प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर कोट्यवधी लोकांनी हा टिझर पाहिला. सोशल मीडियावर फक्त याच सिनेमाची चर्चा होती.