
सामना ऑनलाईन ।लंडन
इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका टीम इंडियाला बसला असून पावसामुळे पहिल्या कसोटीआधी सरावाच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. पहिल्या कसोटीपूर्वी संघाच्या सरावाला वेळ मिळावा म्हणून संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इसेक्सकिरुद्धचा सराव सामना चारऐवजी तीन दिवसांचा करावा यासाठी गळ घातली होती. सध्या बर्मिंगहॅम येथे ढगाळ वातावरण असून रविवारी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, पावसामुळे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या स्विंग गोलंदाजीला खेळपट्टीची साथ मिळेल.




























































