
कोरोनामुळे जगगणना स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जनगनणा, NPR हे पुढच्या वर्षी 2021 मध्ये करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जूननंतर जनगणना सुरू करता येईल का याबाबत केंद्र सरकार चाचपणी करत आहेत. जर जून नंतर जनगणनेची प्रक्रिया सुरू नाही झाली तर 2021 मध्ये एप्रिल महिन्यात जनगणनेचे काम सुरू केले जाईल.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. 2021 मध्ये दोन टप्प्यांत जनगणना होणार होती. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर असणार होता. या टप्प्यात एनपीर आणि घरांची यादी बनवण्याची प्रक्रिया होणार होती. तर दुसरा टप्पा हा 9 ते 28 फेब्रुवारी 2021 मध्ये जनगणना होणार होती. हिंदुस्थानचे माजी रजिस्ट्रार जनरल, जनगणना आयुक्त आणि काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 1991 च्या जनगणनेचे निरीक्षण आणि 2001 च्या जनगणनेचे पुर्नमुल्यांकनही गरजेचे आहे. तसेच 2021 मार्च च्या ऐवजी 2022 मार्चपासून जनगणना सुरू करावी असेही काही तज्ज्ञांनी सुचवले आहे.
दर 10 वर्षांनी देशात जनगणना केली जाते. त्यात शेतीसाठी अनुकूल हवामान, पावसाचा काळ, सणांचाही विचार केला झातो. मार्चपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे ही जनगण्ना पुढे ढकलली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


























































