
सामना ऑनलाईन । वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौर्यामुळे जिल्हातल्या २५ शाळा बंद राहणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत वारणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. या मतदारसंघात मोदी १४ व १५ जुलै रोजी दौरा करणार आहेत. या दौर्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसह त्यांचे सुरक्षारक्षक तसेच निमलष्करी दलाचा जवानांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या जवानांच्या निवासासाठी या शाळांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे दोन दिवस या २५ शाळा बंद राहणार आहेत. आधीच या राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता खालावलेली आहे, त्यात पंतप्रधानांच्या दौर्यामुळे या शाळा बंद राहिल्याने ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.


























































