जामखेड : दत्त देवस्थानचे प्रमुख शिकारे यांचा धारधार शस्त्राने खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिकारे वस्तीवरील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (55) यांचा धारधार शस्त्राने खून झाल्याचे समोर आल्याने खळबळ उड़ाली आहे. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली आहे.

मयत कुशाबा तुळशीराम शिकारे हे शिकारी वस्ती येथे राहत होते. त्यांच्या घराशेजारीच दत्त देवस्थान असून ते या देवस्थानचे प्रमुख होते. रात्री पावणेनऊच्या सुमारास घराबाहेर असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून केला. यात शिकारे यांचा जागीच मृत्यू पावले. याबाबत वस्तीवरील लोकांनी जामखेड पोलिसांना खबर दिली. शिकारे यांचा मृतदेह जामखेड येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. हा खून नक्की कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.