नेहमीच अल्ला मेहेरबान कसा असेल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी

वेस्ट इंडीजने पाकिस्तान संघाला तोफेच्या तोंडी दिलंय. जो तो तोंडाची तोफ चालवतोय. खरंच, हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांत फक्त एक भौगोलिक भिंत आहे. एरवी हरल्यावर क्रिकेटपटूंना सुळावर चढवायची वृत्ती सारखीच.

पण काही काही नेटकऱयांची कल्पनाशक्ती मला भावली. (उझेर हसन रिझवी).

एकाने लिहिलं, ‘इम्रानने त्यांना सांगितलं 100 टक्के प्रयत्न करा. त्यांना वाटलं 100 धावा करा.’

इंग्लंडमधल्या एकाने लिहिलं (साजुद्दीन) ‘मला चालत मॅचला जायला 125 मिनिटं लागली, पण पाकिस्तानचा डाव 111 मिनिटांत संपला.’
एकाने लिहिले, ‘कृपया पाकिस्तानला सांगा, ते टी-20 खेळत नाहीयेत. ही पन्नास षटकांची मॅच आहे.’

काहींनी आठवण करून दिलीय, पाकिस्तानी संघ असा पहिल्याच सामन्यात खड्डय़ात जाणं हे पुढच्या यशाचं द्योतक असतं. मायकल वॉन खवचटपणे म्हणाला, ‘म्हणजे पाकिस्तान आता विश्वचषक जिंकणार.’

इतिहास काय सांगतो? 1992 साली वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला इंग्लंडने अवघ्या 74 धावांत उखडून टाकलं होतं. अनेकांना वाटलं, झाली पाकिस्तानची राख. विस्तव विझला, पण तसे झाले नाही. राखेतून निर्माण होणारा फिनिक्स पक्षी काल्पनिक आहे, पण पाकिस्तानी संघ काल्पनिक नाही. तो खरं उभा राहिला आणि राख इंग्लंडच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांची झाली. अंतिम सामन्यात त्याच पाकिस्तानने इंग्लंडला हरवलं. मेलबोर्नच्या त्या प्रचंड स्टेडियमच्या प्रेसबॉक्समधून पाहिलेला तो वासीम अक्रमचा स्पेल आठवला की अजून अंगावर काटा येतो. इंग्लिश फलंदाज बचाव करताना बाद होत होते.
त्यामुळे पाकिस्तानची राख झाली तरी राखेखालचा अग्नी धगधगता आहे असे नेहमी निसर्गनियम झुगारून वाटतं.

तरीही मला ती भीती यावेळी वाटत नाही. कारण 1992 ची गोष्ट वेगळी होती. तो संघ वेगळा होता. तो इम्रान खान या पाकिस्तानच्या क्रिकेटमधल्या सर्वश्रेष्ठ कर्णधाराचा संघ होता. आता इम्रान पंतप्रधान असला तरी फक्त आशीर्वाद देऊ शकतो, खेळू शकत नाही. तो जावेद मियाँदाद, रमीझ राजा, वासीम अक्रम, सलिम मलिक वगैरेंचा संघ होता. ही प्रतिथयश मंडळी होती. आता गोष्ट वेगळी आहे.

दुसरं म्हणजे पाकिस्तानी फलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांसमोर गुडघे टेकताना जगातल्या गोलंदाजांना एक आशेचा किरण दाखवलाय. पाकिस्तानी फलंदाजांना उसळता चेंडू खेळता येत नाही ही गोष्ट क्षणात जगभर झालीय. जर पाकिस्तानला उसळत्या चेंडूवर स्वार व्हायला जमलं नाही, वेगासमोर त्यांचे रिफ्लेक्सेस कमी पडले, तंत्र वारंवार कमी पडले तर त्यांना गोलंदाज फ्रंटफूटवर खेळवणारच नाहीत. उसळत्या चेंडूंच्या वर्षावात, एखाद् दोन यॉर्कर्स बेमालूमपणे मिसळले जातील.

या मॅचच्या वेळी सुरुवातीला आकाश थोडे ढगाळ होते, पण खेळपट्टीने काही उसळीशी युती केलेली नव्हती. वेस्ट इंडियन गोलंदाजांचा वेग, त्यांचा बाऊन्स यांनी त्यांना नामोहरम केले. त्यांनी चेंडूचा टप्पा उत्कृष्ट ठेवला होता. यॉर्कर अत्यंत हुशारीने वापरला. आपल्या बुमरा, शमीलाही कळलं असेल की पाकिस्तानी फलंदाजांसाठी टप्पा काय असावा? आणि त्यांच्याकडेही ताशी 145 किलोमीटर्सच्या वेगाने चेंडू टाकायची आणि चेंडू उसळवण्याची क्षमता आहे. तीच गोष्ट दक्षिण आफ्रिकी, इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या बाबतीत आहे. या विंडीज-पाकिस्तान सामन्यातून पाकिस्तानला गवसलेली एकमेव गोष्ट म्हणजी आमीरचा फॉर्म, पण आमीर हा वासीम अक्रम नाही आणि धावांचा पाठिंबा नसेल तर वासीमच काय अल्लासुद्धा काही करू शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, 30 जानेवारीपासून पाकिस्तान सतत अकरावेळा पन्नास षटकांच्या सामन्यात पराभूत झालाय. हा तळच आहे की, प्रत्येक मॅचगणिक तळाची खोली वाढत गेली तर वरची झेप कठीण पडू शकते. इथून पाकिस्तानी संघ कदाचित उसळेलही, पण हे उसळणं बूच काढलेल्या सोडय़ासारखं असेल की शॅम्पेनसारखं हे पाहायला मजा येईल. मला अजून तरी शॅम्पेन दूर वाटतेय. खूप खूप दूर. पण हे अंतर पाकिस्तानने 14 जुलैला ओलांडले, इतिहास पुन्हा रचला तर त्यांना मी खराखुरा जरासंध मानेन आणि जागतिक क्रिकेटमध्ये कृष्णच उरला नाही असे समजेन. विश्वचषक जिंकणार.’

इतिहास काय सांगतो? 1992 साली वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला इंग्लंडने अवघ्या 74 धावांत उखडून टाकलं होतं. अनेकांना वाटलं, झाली पाकिस्तानची राख. विस्तव विझला, पण तसे झाले नाही. राखेतून निर्माण होणारा फिनिक्स पक्षी काल्पनिक आहे, पण पाकिस्तानी संघ काल्पनिक नाही. तो खरं उभा राहिला आणि राख इंग्लंडच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांची झाली. अंतिम सामन्यात त्याच पाकिस्तानने इंग्लंडला हरवलं. मेलबोर्नच्या त्या प्रचंड स्टेडियमच्या प्रेसबॉक्समधून पाहिलेला तो वासीम अक्रमचा स्पेल आठवला की अजून अंगावर काटा येतो. इंग्लिश फलंदाज बचाव करताना बाद होत होते.
त्यामुळे पाकिस्तानची राख झाली तरी राखेखालचा अग्नी धगधगता आहे असे नेहमी निसर्गनियम झुगारून वाटतं.

तरीही मला ती भीती यावेळी वाटत नाही. कारण 1992 ची गोष्ट वेगळी होती. तो संघ वेगळा होता. तो इम्रान खान या पाकिस्तानच्या क्रिकेटमधल्या सर्वश्रेष्ठ कर्णधाराचा संघ होता. आता इम्रान पंतप्रधान असला तरी फक्त आशीर्वाद देऊ शकतो, खेळू शकत नाही. तो जावेद मियाँदाद, रमीझ राजा, वासीम अक्रम, सलिम मलिक वगैरेंचा संघ होता. ही प्रतिथयश मंडळी होती. आता गोष्ट वेगळी आहे.

दुसरं म्हणजे पाकिस्तानी फलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांसमोर गुडघे टेकताना जगातल्या गोलंदाजांना एक आशेचा किरण दाखवलाय. पाकिस्तानी फलंदाजांना उसळता चेंडू खेळता येत नाही ही गोष्ट क्षणात जगभर झालीय. जर पाकिस्तानला उसळत्या चेंडूवर स्वार व्हायला जमलं नाही, वेगासमोर त्यांचे रिफ्लेक्सेस कमी पडले, तंत्र वारंवार कमी पडले तर त्यांना गोलंदाज फ्रंटफूटवर खेळवणारच नाहीत. उसळत्या चेंडूंच्या वर्षावात, एखाद् दोन यॉर्कर्स बेमालूमपणे मिसळले जातील.

या मॅचच्या वेळी सुरुवातीला आकाश थोडे ढगाळ होते, पण खेळपट्टीने काही उसळीशी युती केलेली नव्हती. वेस्ट इंडियन गोलंदाजांचा वेग, त्यांचा बाऊन्स यांनी त्यांना नामोहरम केले. त्यांनी चेंडूचा टप्पा उत्कृष्ट ठेवला होता. यॉर्कर अत्यंत हुशारीने वापरला. आपल्या बुमरा, शमीलाही कळलं असेल की पाकिस्तानी फलंदाजांसाठी टप्पा काय असावा? आणि त्यांच्याकडेही ताशी 145 किलोमीटर्सच्या वेगाने चेंडू टाकायची आणि चेंडू उसळवण्याची क्षमता आहे. तीच गोष्ट दक्षिण आफ्रिकी, इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या बाबतीत आहे. या विंडीज-पाकिस्तान सामन्यातून पाकिस्तानला गवसलेली एकमेव गोष्ट म्हणजी आमीरचा फॉर्म, पण आमीर हा वासीम अक्रम नाही आणि धावांचा पाठिंबा नसेल तर वासीमच काय अल्लासुद्धा काही करू शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, 30 जानेवारीपासून पाकिस्तान सतत अकरावेळा पन्नास षटकांच्या सामन्यात पराभूत झालाय. हा तळच आहे की, प्रत्येक मॅचगणिक तळाची खोली वाढत गेली तर वरची झेप कठीण पडू शकते. इथून पाकिस्तानी संघ कदाचित उसळेलही, पण हे उसळणं बूच काढलेल्या सोडय़ासारखं असेल की शॅम्पेनसारखं हे पाहायला मजा येईल. मला अजून तरी शॅम्पेन दूर वाटतेय. खूप खूप दूर. पण हे अंतर पाकिस्तानने 14 जुलैला ओलांडले, इतिहास पुन्हा रचला तर त्यांना मी खराखुरा जरासंध मानेन आणि जागतिक क्रिकेटमध्ये कृष्णच उरला नाही असे समजेन.
[email protected]