वन्यजीवप्रेमींसाठी ‘डायनॅस्टीज’ येतेय

वन्यजीवांचे आयुष्य आणि पर्यावरणाचा वाढता धोका असे विविध मुद्दे घेऊन सोनी बीबीसी अर्थवर 17 जूनपासून ‘डायनॅस्टीज’ ही सीरीज सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान रात्री 9 वाजता ही सीरीज बघता येईल. जागतिक ख्यातीचे निसर्गतज्ञ सर डेक्हिड एटनबरो यांनी सादर केलेल्या डायनॅस्टीजमध्ये जगातील पाच अत्यंत सुंदर परंतु धोक्यातील प्राण्यांच्या जीवाचा अभ्यास केला जातो. एम्परर पेंग्विन, चिम्पॅन्झी, सिंह, रंगीत कोल्हे आणि वाघ. त्यांचे जीवन मालिकेत बघता येतील. ‘डायनॅस्टीज’च्या प्रमोशनसाठी जिम सर्भ, झरीन खान, ओमंग कुमार, सुशांत सिंग, दिव्यांका त्रिपाठी दाहिया, विवेक दाहिया, सनाया इराणी, मोहित सेहगल, करण कुंद्रा, अनुषा दांडेकर, शिविन नारंग, टिना दत्ता, आरजे मलिष्का, प्रल्हाद कक्कर आदी कलाकार रेड कार्पेटवर उतरले.