राजस्थानमधील बिकानेरला भुकंपाचा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
earthquake-measurement

राजस्थानमधील बिकानेर जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला रविवारी सकाळी भुकंपाचा हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल एवढी होती.

भूकंपाचा हादरा बसताच जीव वाचवण्यासाठी नागरिक इमारतीबाहेर पडले व रस्त्यावर धावू लागले. अनेक ठिकाणी इमारतींची तावदाने फुटल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातच राजस्थाममधील झुंझुनू जिल्ह्याला भुकंपाचा हादरा बसला होता. या भुकंपाची तीव्रता 3.8 स्केल एवढी होती. या घटनेस महिना उलटत नाही तोपर्यंत राजस्थानला दुसऱ्यांदा भूकंपाचा झटका बसल्याने नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण आहे.