गुजरातला पुन्हा भूकंपाचे हादरे, अभ्यासकांचा इशारा

गुजरातमधील वायव्य भागात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के (Earthquake in Gujarat) जाणवले आहेत. सोमवारी सकाळी 12.57 वाजता भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 होती. या भूकंपाचे केंद्र राजकोटच्या वायव्यास 83 कि.मी. होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजता गुजरात येथे भूकंप झाला. त्याचे केंद्र कच्छ जिल्ह्यातील भचाऊ जवळ होते. कच्छ, राजकोट, अहमदाबाद आणि पाटण या शहरांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. यानंतर जिवाच्या भीतीने बहुतेक लोक घराबाहेर गेले होते. या सोबत जम्मू-कश्मीर अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.

यापूर्वी दोन महिन्यांपासून चाललेल्या लॉकडाऊनमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून हलके हादरे जाणवले आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच आठवड्यात सोमवारी दुपारी 2.1 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे केंद्र हरियाणाच्या गुरुग्राममध्ये नोंदले गेले आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे हादरे 12 एप्रिलपासून सुरू झाले (3.5 तीव्रता). त्यानंतर वेगवेगळ्या दिवसात 14 धक्के बसले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वारंवार असे धक्के बसणे हे मोठ्या भूकंपाचे लक्षण असू शकते. त्यामुळे या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या