उत्तर हिंदुस्थान भूकंपाने हादरला

earthquake-measurement

राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थान भूपंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. राष्ट्रीय भूपंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार आज मंगळवारी तब्बल चार धक्के बसले. दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी पहिला 4.6 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला, तर दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी तब्बल 6.2 रिश्टर स्केलचा दुसरा तीव्र धक्का. तसेच दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी 3.8 रिश्टर स्केलचा तिसरा आणि 3 वाजून 19 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केलचा चौथा धक्का जाणवला. भूपंपाचे धक्के जाणवताच दिल्लीतील अनेक कार्यालयांतील कर्मचाऱयांनी रस्त्यावर धाव घेतल्याचे चित्र होते.